Share

Siddharth Jadhav : “प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना…” सिद्धार्थ जाधवची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Published On: 

मुंबई : सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. या अभिनेत्याने मराठी चित्रपटांबरोबर आता हिंदी चित्रपटांमध्ये देखील चांगली ओळख निर्माण केली आहे. सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती यांची जोडी ही गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे चर्चेत होते. दरम्यान, सिद्धार्थने त्याच्या मुलीचे वाढदिवस साजरा केलेले फोटो त्याच्या इंस्टाग्रामवारू शेअर केले होते. या फोटोमध्ये सगळ्यांचे लक्ष सिद्धार्थची पत्नी तृप्तीने वेधले होते. आता यामध्येच सिद्धार्थने शेअर केलेली आणखी एक पोस्ट चर्चेत आली आहे.

सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, “आदर अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्त्वाच्या कामातून वेळ काढतात आणि प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काहीही महत्त्वाचे वाटत नाही.” सध्या त्याची ही पोस्ट खुप चर्चेत आली आहे.

सिद्धार्थच्या या पोस्टवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या पोस्टमुळे सिद्धार्थ आणि त्याची पत्नी खरंच वेगळे राहत आहेत का? अशा चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान, या दोघांचे सोशल मीडिया अकाऊंट पाहिलं असता तर गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी एकमेकांसाठी एकही पोस्ट केलेली नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!