महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय उलथापालथ होत असताना आता नवीन सरकार स्थापनेची कसरत जोरात सुरू झाली आहे. काल रात्री ९ वाजता फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं होत. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा राज्यपालनाकडे सुपूर्द केला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने एकनाथ शिंदे आणि भाजपने राज्यात नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे.
संध्याकाळी सात वाजता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. यानंतर आता थोड्या वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह येत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केलं आहे. एकनाथ शिंदे यांचा गट आमच्या सोबत आला आहे. अजूनही अपक्ष आमच्यासोबत आले आहेत. याबाबतचं पत्र आम्ही राज्यपालांना देणार असल्याचं देखील ते म्हणाले.
दरम्यान, आज राजभवन येथे अतिशय छोटेखानी पद्धतीन शपथविधी सोहळा होणार आहे. राजभवनात भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील असे त्यांनी सांगितले.
या सरकारच्या मंत्रिमंडळात फडणवीस नसतील अशी ही घोषणा करण्यात आली आहे. मात्र मी या मंत्रिमंडळात नसलो तरीही एकनाथ शिंदे यांना मी बाहेरून पाठिंबा देणार असल्याच देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांचा हा मास्टरस्ट्रोक असल्याच म्हंटल जात आहे. या संदर्भात पुढे के होणार याकडे सर्वांच लक्ष लागलेल आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

