🕒 1 min read
मुंबई : राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे.
राज्यात आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र लढल्यास भारतीय जनता पक्षाला ५० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली होती. आता भाजप नेत्यांनी त्यांच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
‘… तर भाजपचे ५० आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत: जयंत पाटील. दगाबाजांबरोबर आघाडी करून सत्ता मिळवणाऱ्यांनी अशा वल्गना करू नये. जयंतराव भाजपाच्या पराभवाबाबत इतके आश्वस्थ आहात तर उद्या विधानसभा बरखास्त करून राज्यात निवडणुका घ्या… दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ देत…’ असं आव्हानच भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जयंत पाटील यांना प्रत्युत्तर देताना दिलं आहे.
… तर भाजपचे ५० आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत: जयंत पाटील
दगाबाजांबरोबर आघाडी करून सत्ता मिळवणाऱ्यांनी अशा वल्गना करू नये.
जयंतराव भाजपाच्या पराभवाबाबत इतके आश्वस्थ आहात तर उद्या विधानसभा बरखास्त करून राज्यात निवडणुका घ्या… दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ देत… pic.twitter.com/Mhqs6IhLyv— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 10, 2020
महत्वाच्या बातम्या
- केवळ मोबाईलवरील ऍप्सवर बंदी घालायची, फुटकळ निर्बंध लादायचे आणि…; शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा
- तृप्ती देसाईंना शिर्डीमध्ये प्रवेशबंदी! शिर्डी पोलीसांनी तृप्ती देसाईंना दिली नोटीस
- मराठा आरक्षण : सरकार मराठा समाजाची थट्टा करत आहे : समरजितसिंह घाटगे
- काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून राज्य सरकार पडणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा
- खा. शरद पवारांच्या नावाने महाविकास आघाडी सरकार लागू करणार योजना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
