मुंबई: राज्यपरिवाहन मंडळाच्या बसेस म्हणजेच गावागावांच्या रस्त्यांहून धावणारी लालपरी यंदा मात्र कोरोंना महामारी मुळे पहिल्यांदाच तब्बल सात महीने बंद राहिली आहे. त्यामुळे एसटी ला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. लॉक डाउन नंतर आता हळूहळू अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे ठप्प झालेले सर्वच क्षेत्रे कार्यरत होऊ लागली आहेत. मात्र अद्याप देखील एसटी ला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद म्हणावं तितका मिळत नाहीय. त्यामुळे या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी एसटीची हंगामी तिकीट दर वाढ यंदा रद्द करण्यात आली आहे.
त्यामुळे यंदा प्रवाशांना दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये देखील प्रचलित तिकीट दरानुसार प्रवास करता येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष अँड. अनिल परब यांनी दिली आहे. दरवर्षी राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेनुसार यात्रा, सणासुदीच्या काळात, सलग सुट्ट्या तसेच सप्ताह अखेर अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्त्रोत म्हणून 30 टक्क्यांपर्यंत हंगामी दरवाढ करण्याचे अधिकार महामंडळाला आहेत त्यानुसार 10 ते 15 टक्क्यांपर्यंत तिकीट दरवाढ करून ही हंगामी दरवाढ केली जाते. त्यातून अतिरिक्त महसूल प्राप्त केला जातो.
मात्र यावर्षी कोरोणा संकटामुळे अगोदरच प्रवासी संख्या कमी असलेल्या एसटी कडून सर्वसामान्य प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडू नये सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करण्यात आली असल्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. तर ही दरवाढ रद्द करून एसटीने प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे माहिती अनिल परब यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण : तातडीने घटनापीठ स्थापन करा! सरकारची मुख्य न्यायमुर्तींना दुसऱ्यांदा विनंती
- नगरच्या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवला १० हजारांचा चेक; म्हणे गांजा व खसखसची शेती करू द्या!
- १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरे उघडा अन्यथा टाळे तोडू; भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचा इशारा
- मुंबई : ९०० कोटींचा जमीन घोटाळा झाल्याचा सोमय्या यांचा आरोप;चौकशी करण्याची मागणी
- ‘लक्ष्मी बॉम’ आणखी एका वादाच्या विळख्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

