Share

‘लक्ष्मी बॉम’ आणखी एका वादाच्या विळख्यात

Published On: 

मुंबई : खिलाडी कुमारचा हॉरर कॉमेडी ड्रामा ‘लक्ष्मी बॉम’ हा सिनेमा दिवाळीच्या दरम्यान प्रदर्शित होणार आहे. येत्या ९ नोव्हेंबरला हा सिनेमा डायरेक्ट ‘ओटीटी प्लेटफ़ॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टार’ वर प्रदर्शित होणार होता. परंतु या वरून आता नवनवीन वाद होत आहेत. या सिनेमावरून बरेच वाद चालू आहेत. या सिनेमामध्ये खिलाडी कुमार ‘ट्रांसजेंडर’ च्या भूमिकेत पण दिसणार आहे. असे पहिल्यांदा होणार आहे कि खिलाडी कुमार हा ‘ट्रांसजेंडर’ भूमिका साकारताना दिसणार आहे. अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम’ वादात सापडला असून हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही. असे देखील समोर येत आहे.

याचदरम्यान आता या सिनेमावरती अजून एक वाद निर्माण झाला आहे. मुकेश खन्ना यांनी आता एक पोस्ट शेअर करत या सिनेमाची निंदा केली आहे. लक्ष्मी बॉम्ब या नावाने कोणताही सिनेमा रिलीज व्हायला हवा? यावर देशभर वादविवाद सुरु आहे. काही लोक हा सिनेमा बॅन करण्याची मागणी करत आहेत. मला विचाराल तर बॅन योग्य नाही. कारण अद्याप कोणीच सिनेमा पाहिलेला नाही. केवळ ट्रेलर पाहिला आहे. मात्र फक्त टायटलची गोष्ट केलीच तर लक्ष्मीच्या पुढे बॉम्ब जोडणे खोडसाळपणा आहे. कमर्शिअल इंटरेस्ट हाच एक विचार यामागे असल्याचे वाटते.

चित्रपटाच्या या नावाला परवानगी द्यायला हवी? तर कदापि नाही. तुम्ही अल्लाह बॉम्ब किंवा बदमाश जीसस असे शीर्षक ठेऊ शकता? नाही ना, मग लक्ष्मी बॉम्ब टायटल कसे चालणार? असे वाद निर्माण व्हावे, त्यावरून चर्चा व्हावी यासाठीच असा धूर्तपणा केला जातो. हे असेच होते आणि होत राहील. मात्र कधीतरी हे थांबवावे लागेल आणि हे केवळ जनताच थांबवू शकते.

या व्यावसायिक लोकांमध्ये जराही हिंदूंची भीती नाही. दुस-या धर्मासोबत असा पंगा घेऊन दाखवा, तलवारी निघतील. म्हणून अन्य धर्माशी हे लोक पंगा घेत नाही. हिंदू धर्म मात्र यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट आहे. प्रत्येक निर्माता आपला सिनेमा हिट करू इच्छितो, त्यासाठी जाणीवपूर्वक असे वाद निर्माण केले जातात. लक्ष्मी बॉम्ब हा सिनेमाही त्यापैकीच एक आहे. डिफ्युज करा याला…’, असे मुकेश खन्ना यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले.

https://www.instagram.com/p/CG1gJ9zpGvB/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!