Share

काश्मीर प्रश्न सोडवणाऱ्या अमित शहांना ‘या’ लेखिकेने दिले वाहतूक समस्या सोडवण्याचे आव्हान

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरचे विभाजन करून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयावर राज्यसभेत शिक्कामोर्तब झाला आहे. तर आज गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव मांडताचं विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला आहे. तसेच ही दडपशाही असल्याचं नारा दिला आहे.

अमित शाह आणि नरेंद्र मोदी सरकारचे या मुद्द्यावरून कौतुक होत असताना प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी अमित शाह यांना वेगळचं आव्हान दिल आहे. ‘त्यांनी प्रिय अमित शाह, तुम्ही काश्मीर समस्या सोडवली आहे…त्यामुळे आता कृपया वेळ काढून साकीनाक्याच्या वाहतूक कोंडीची समस्याही सोडवा. ही समस्याही १९४७ पासून अद्याप सुटलेली नाही”, अशा आशयाचं ट्विट शोभा डे यांनी केलं आहे.

दरम्यान, कलम ३७० हटवण्याचा धाडसी निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्या दृष्टीने देशाच्या वरिष्ठ सभागृहात सोमवारी पहिली प्रक्रिया पार पडली. राज्यसभेत ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव बहुमताने संमत झाला. मात्र सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी आवाज उठवला. ही प्रक्रिया घटना बाह्य पद्धतीने सुरु असून जम्मू काश्मीरमध्ये सरकार नसताना देखील त्यांचे मत गृहीत धरून हे कलम रद्द केले जात असल्याचा विरोधकांकडून सांगितल जात आहे.

तसेच मोदी सरकारच्या या निर्णयानंतर देशात उत्साहाचे वातावरण आहे. तर संपूर्ण देशवासियांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. मोदी सरकारच्या निर्णयानंतर जम्मू काश्मीरचे विभाजन झाले आहे. जम्मू–काश्मीर स्वतंत्र केंद्रशासित राज्य असेल. तर लडाख हे विधानसभा नसलेले केंद्रशासित प्रदेश असेल. तसेच कलम ३७० मुळे काश्मीरचा इतका दिवस विकास होऊ शकला नाही, मात्र आता ३७० कलमची अडसर दूर झाल्याने जम्मू काश्मीरमध्ये येत्या ५ वर्षात पुन्हा नंदनवन करून दाखवतो, असा शब्द अमित शहांनी सभागृहात दिला.

काश्मीर भारताचा अविभाज्य घटक; प्रसंगी यासाठी जीवही देऊ : अमित शाह

ऐतिहासिक कलम ३७० बाबत लोकसभेत चर्चा सुरु, मात्र विरोधकांचा थयथयाट

काश्मीर प्रश्नी संयुक्त राष्ट्रसंघानं हस्तक्षेपाची मागणी करणाऱ्या आफ्रिदीवर होतेय चौफेर टीका

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!