Share

महाराष्ट्रातील ‘ही’ बहुचर्चित महिला खासदार भाजपच्या संपर्कात

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : अमरावतीच्या नवनिर्वाचित खा. नवनीत कौर राणा या भाजप नेत्यांच्या संपर्कात असून येत्या काही दिवसात त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहेत. तसेच राणा यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे भेट देखील घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठींब्याने निवडून आलेल्या नवनीत कौर राणा या भाजपमध्ये जाणार का हे पाहणे औत्सुक्याच ठरणार आहे.

नवनीत राणा यांनी मात्र, मतदारसंघातील विकासकामांसाठी शाह यांची भेट घेतल्याचे सांगितले. राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी ‘राजकारणात बदल होत राहतात’, असं सुचक वक्तव्य केलं होतं, त्यामुळे राणा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला अधिक जोर चढला आहे.

लोकसभा निवडणुकीत नवनीत कौर राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून उतरल्या होत्या. तर त्यांच्या विरोधात युतीकडून शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ उभे होते. मात्र नवनीत कौर राणा यांना कॉंग्रेस राष्ट्रवादीचा खंबीर पाठींबा असल्याने त्या बहुमतांनी विजयी झाल्या. तर आनंदराव अडसूळ यांना मोदींच्या सुप्तलाटेत देखील पराभव स्वीकारावा लागला.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!