🕒 1 min read
मुंबई : जुन महिन्यात भारत आणि न्युझीलंड संघात जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारताचा न्युझीलंडने ८ गडी राखुन पराभव केला. यासह न्युझीलंडने पहिल्यावहिल्या डब्ल्युटीसी स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
या स्पर्धेच्या घोषणेनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना कोहली म्हणाला, ‘आयसीसीच्या पहिल्या डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडविरुद्ध खेळणे हे खुपच गौरवास्पद आणि अविस्मरणीय होते. फक्त अंतिम सामनाच नव्हे तर संपुर्ण स्पर्धेत खेळाडू ज्या दृढनिश्चयाने खेळताना दिसले.’ असे कोहली म्हणाला.
More about the #WTC23 points system ????https://t.co/Vh54VftU10
— ICC (@ICC) July 14, 2021
यावेळी पुढे बोलताना कोहली म्हणाला की, ‘तसेच या स्पर्धेला प्रेक्षकांनी दिलेले प्रेत्साहन खुपच शानदार होते. आणि मला खात्री आहे की प्रेक्षकही डब्ल्युटीसी स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामासाठी उत्सुक आहे. इंग्लंडविरुद्ध मालिकेपासुन आम्ही पुन्हा एकदा जोमाने त्याच उत्साहात या स्पर्धेची सुरुवात करु, तसेच मी आशा करतो की चाहत्यांना पुन्हा जल्लोष करण्याची संधी देऊ’ असे कोहली म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या
- दिया मिर्झा दोन महिन्यांपूर्वीच झाली आई; भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती
- करन्सी नोट प्रेसमधील 5 लाख चोरी प्रकरण, नाशिक पोलिसांच्या तपासाला सुरवात
- लडाख कचरा प्रकरणावर आमिरच्या टीमने सोडलं मौन, म्हणाले….
- ‘संजय राऊत यांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं आणि तेच अग्रलेखात लिहिलं’
- झोटिंग समितीचा गायब अहवाल सापडला, एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
