Share

Health Care Tips | हळदीच्या ‘या’ खास पेयाचे मिळू शकतात आरोग्याला अनेक फायदे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: अनेक वर्षापासून हळद (Turmeric) ला आयुर्वेदिक औषधी वनस्पती मानले जाते. कारण हळदीमध्ये आढळणाऱ्या अँटी-अँक्सीडेंट आणि अँटी-एम्प्लॉयमेंटरी गुणधर्म आपल्या आरोग्य (Health) साठी खूप फायदेशीर असतात. हळद हा एक मसाला पदार्थ असून सामान्यतः भारतीय प्रत्येक स्वयंपाक घरात सहजपणे सापडते. त्याचबरोबर आपण हळदीचे दूध किंवा हळदीचे पाणी प्यावे असे सल्ले नेहमी ऐकत असतो. कारण हळद आपल्या शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्याचबरोबर हळदीचे योग्य पद्धतीने सेवन केल्यावर तुमचे वजन देखील नियंत्रणात राहू शकते. अनेक रिचार्जमध्ये असे समोर आले आहे की, दररोज सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिल्यास तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते. त्याचबरोबर हळदीचे एक विशेष पेय पिल्यास तुम्ही अनेक रोगांपासून स्वतःचे संरक्षण करू शकतात. त्याबद्दल आम्ही आज या बातमीच्या माध्यमातून अधिक माहिती सांगणार आहोत.

हळदीचे आरोग्यस (Health) फायदेशीर पेय कसे बनवायचे?

  • सर्वप्रथम एका भांड्यामध्ये दोन वाट्या पाणी टाकून त्यामध्ये हळद मिसळून हळदीच्या गुठळ्या उकळून घ्या.
  • हे पाणी निम्मे होईपर्यंत उकळू द्या. पाणी अर्ध झाल्यावर ते गाळून घ्या.
  • या उकळून गाळलेल्या पाण्यामध्ये थोडासा मध मिसळा. त्याचबरोबर या पाण्याची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये मीठ किंवा काळी मिरी देखील घालू शकता.
  • हळदीचे हे पेय बनवताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की हळदीचे हे पाणी नेहमी त्याच्या गुठळ्या पासून बनवले जाते.
  • रोज रिकाम्या पोटी तुम्ही या हळदीच्या पाण्याची सेवन केल्यास तुम्हाला त्याचा परिणाम काही दिवसातच दिसायला लागेल.

हळदीचे इतर अनेक फायदे

सांधेदुखी कमी होते

हळदीच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. त्याचबरोबर पोटदुखीच्या समस्या दूर होऊ शकतात. हळदीच्या पाण्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास देखील मदत होते.

डायबिटीज

नियमित हळदीच्या पाण्याचे सेवन हे डायबिटीस रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण या पाण्याची सेवन केल्याने डायबिटीस पासून आराम मिळू शकतो. त्याचबरोबर डायबिटीस रुग्णांना हळदीचे पाणी पिल्याने ताजेपणा जाणवू शकतो.

कॅन्सर

प्रोटेस्ट, स्तन आणि फुफुसाच्या कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी हळद खूप प्रभावी मानली जाते. हळद कॅन्सर पासून तुमचा बचाव करण्याचे काम करू शकते.

टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!