T20 World Cup। नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी ३० ऑक्टोबर रोजी टी-२० विश्वचषकातील ३० वा सामना पार पडला. पाकिस्तान आणि नेदरलँड्सला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ बलाढ्य आफ्रिकन संघाला हरवण्यासाठी मैदानात उतरला. यावेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर १३३ धावांचे आव्हान दिले. या टार्गेटचा पाठलाग करत असताना दक्षिण आफ्रिकेने दणदणीत विजय मिळवला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 19.4 षटकांत 5 गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले. डेव्हिड मिलरने नाबाद 59 तर एडन मार्करामने 52 धावा केल्या. मात्र त्याआधी टीमला एक झटका बसला आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना बांग्लादेश विरुद्ध होणार आहे. एडलेडमध्ये ही मॅच होईल. या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवणं आवश्यक आहे. त्याचवेळी या मॅचमध्ये दिनेश कार्तिक खेळणार नाहीय. त्याच्या लोअर बॅकला दुखापत झालीय.
दिनेश कार्तिकच्या जागी विकेटकीपर ऋषभ पंतच खेळणं निश्चित आहे. काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना दिनेश कार्तिकला दुखापत झाली होती. रविवारी सामना सुरु असताना दिनेश कार्तिकने दुखापतीमुळे मैदान सोडलं. त्याच्याजागी ऋषभ पंत विकेटकिपींगसाठी मैदानात उतरला. टी 20 वर्ल्ड कपमध्ये ऋषभने पहिल्यांदा ग्लोव्हज हातात घातले.
महत्वाच्या बातम्या :
- Prakash Ambedkar | मोदी केवळ गुजरातचे पंतप्रधान, प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात
- Travel Guide | गर्दी सोडून शांततेत फिरायला जायचं असेल, तर महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाला द्या भेट
- Anushka Sharma। विराटच्या हॉटेल रुम व्हिडीओवर अनुष्का संतापली; म्हणाली ‘हेच तुमच्या बेडरूममध्ये..’
- Electric Bike | लवकरच येऊ शकते ‘या’ बाईक चे इलेक्ट्रिक व्हर्जन
- Raj Thackeray | मनसे, भाजप आणि शिंदे गटाची महायुती होणार का?, राज ठाकरे म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

