Share

Prakash Ambedkar | नरेंद्र मोदींनी एकतरी पत्रकार परिषद घेतली का? ; प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

Prakash Ambedkar | चंद्रपूर :  वेदांता – फॉक्सकॉन या मोठ्या प्रकल्पानंतर C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ (Tata AirBus Project) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. IAF सौद्यांतर्गत महाराष्ट्रात सुरू होणारा टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमधील वडोदरा येथे स्थलांतरित झाला आहे. शिंदे -फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या १ लाख ८० हजार कोटींच्या ४ प्रकल्पांपैकी ३ गुजरातला नेण्यात आले. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यांचे प्रोजेक्ट गुजरातला नेत आहेत. ते फक्त नावाला भारताचे पंतप्रधान आहे. पण प्रत्यक्षात ते गुजरातचे पंतप्रधान आहेत, अशी व्यवस्था आहे. नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे अडचणीत आले आहेत. एकनाथ शिंदे जिथे-जिथे जातील तिथे त्यांना याचे उत्तर द्यावे लागेल. पहिला प्रकल्प गेला, तेव्हा आम्ही जाबाबदार नाही असे, शिंदे म्हणाले होते. पण आता दोन प्रकल्प गेले आहेत. त्याचं उत्तर तुम्ही द्यावे. आणखी एक प्रकल्प जाण्याच्या मार्गावर आहे.”

बुद्धिजीवी लोकांना शहरी नक्षलवादी ठरवण्यात येत आहे-

“नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत एकतरी पत्रकार परिषद घेतली आहे का?. हा भारतामधला सर्वात मोठा प्रश्न आहे. बाहेर देखील गेले असतील तर तिथे जॉईंट पत्रकार परिषद होतात. तिथे स्टेटमेंट वाचण्यापलीकडे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तरे दिली असतील तर त्याचा व्हिडीओ काढून देशभर पसरवला पाहीजे, अशी माझी भाजपकडे मागणी आहे. शिकलेल्या माणसांबद्दल मोदींना आता अडचण व्हायला लागली आहे. कारण मोदींच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे होत आहेत. याची सुरुवात सुप्रीम कोर्टाकडून झाली. नोटबंदीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे लिहणारे, बुद्धिजीवी या लोकांना शहरी नक्षलवादी ठरवण्यात येत आहे,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!