Share

Travel Guide | पश्चिम बंगालमधील ‘हे’ ठिकाण ठरू शकते फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सध्या सर्वत्र थंडीची हुडहुडी पसरत चाललेली आहे. हे हवामान पर्यटकांसाठी सर्वोत्तम वातावरण मानले जाते. पर्यटक या वातावरणामध्ये फिरण्यासाठी बाहेर पडतात. कारण हे वातावरण खूप गरम किंवा खूप थंड नसते. ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत फिरण्यासाठी सर्वोत्तम कालावधी मानला जातो. जर तुम्ही तुमच्या रोजच्या दिनाच्या वेळेला कंटाळून कुठे फिरायला (Travel) जाण्याचा प्लॅन करत असाल, तर आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एका सुंदर ठिकाणाबद्दल माहिती सांगणार आहोत. हे ठिकाण पश्चिम बंगाल राज्यातील सिलिगुडीपासून 67 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणचे नाव आहे कालिम्पॉंग हिल स्टेशन (Kalimpong Hill Station).

कालिम्पॉंग हिल स्टेशन ट्रॅव्हल गाईड (Kalimpong Hill Station Travel Guide)

  • कालिम्पॉंग हिल स्टेशन एक निसर्गसौंदर्याने नटलेली जागा असून येथील बर्फाच्छादित शिखरे पाहण्यासारखे आहे. हे हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून 4000 फूट उंचीवर आहे. कालिम्पॉंग हिल स्टेशन या ठिकाणी तुम्हाला निसर्ग सौंदर्य सोबतच पश्चिम बंगालच्या परंपरा आणि संस्कृतीची ही ओळख होईल.
  • कालिम्पॉंग हिल स्टेशन निसर्गप्रेमींसाठी खास आहे. कारण निसर्गप्रेमी लोकांसाठी इथे विविध प्रकारच्या पक्षांचे कळप बघायला मिळतील. त्याचबरोबर येथील नियोरा नॅशनल पार्क पक्षीप्रेमींसाठीचे प्रमुख आकर्षन आहे. त्याचबरोबर या हिल स्टेशनवर लेपच्या म्युझियमचा देखील पर्यटक आनंद घेऊ शकता.
  • कालिम्पॉंग हिल स्टेशन नयनरम्य दृश्य असलेले हिल्स स्टेशन आहे. इथे तुम्हाला बौद्ध मठ, चर्च आणि तिबेटी हस्तकलेची ओळख होईल. कारण इथे अनेक सांस्कृतिक आणि कला वारसा असलेली ठिकाणी आहेत.
  • कालिम्पॉंग हिल स्टेशन हे ठिकाण दार्जिलिंगच्या उत्तरेकडील भागात आहे. इथे तुम्ही अनेक ॲडवेंचरही करू शकतात. यामध्ये प्रामुख्याने पॅराग्लायडिंग आणि ट्रेकिंग सारख्या आकर्षक गोष्टी तुम्ही करू शकता. इथे स्थित असलेले देवलो हिल्स हे सर्वोच्च ठिकाण आहे. जिथून तुम्ही निसर्गाचा सुंदर नजरांना तुमच्या डोळ्यात कैद करू शकता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!