टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झाले आहेत. अनेक नेत्यांकडून आपापल्या मतदारसंघाचा आढावा घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, नेते आणि कार्यकर्ते आता कामाला लागले आहेत.
याच पार्श्वभूमीवर भाजपनेही महाजनादेश यात्रेचे आयोजन केले आहे. यातील सोलापूर येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विरोधक विचारतात कामं केली तर यात्रा कशाला काढता? महाजनदेश यात्रा आमचं दैवत असलेल्या जनतेसाठी आहे. त्यांचं दर्शन घेण्यासाठी ही यात्रा आहे. आम्ही विरोधक असताना संघर्षाची आणि सत्तेत असताना संवादाची यात्रा काढतो, ही संवादाची यात्रा आहे, जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी ही यात्रा आहे असं विधान केले.
पुढे बोलताना फडणवीस यांनी ‘येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पूर्वीपेक्षा चांगला विजय होईल. नवीन इतिहास घडेल. पुन्हा युतीचं सरकार येईल. दुसरा टप्पा संपला, मात्र तिसरा टप्पा घेऊन मी पुन्हा येईल असं विधान केले. दरम्यान या सभेनंतर महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता झाली आहे. या सांगता सभेला अमित शाह, चान्फ्र्कांत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
दरम्यान, अमित शाहांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे उस्मानाबादचे विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच येत्या काही दिवसांत इतरही अनेक नेते भाजप प्रवेशासाठी इच्छुक आहेत.
- आदित्य ठाकरेंनी उडवली बाळासाहेब थोरातांची खिल्ली
- १३ तारखेला लागणार विधानसभेची आचारसंहिता, रावसाहेब दानवेंच भाकीत
- छगन भुजबळ यांनी रिपब्लिकन पक्षात यावे – रामदास आठवले
- ‘पाकिस्तानविरुद्ध युद्ध आम्ही जिंकले तरी आम्हालाचं देशद्रोही म्हटलं जातंय’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

