टीम महारष्ट्र देशा : शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ‘जन आशीर्वाद’ यात्रेवर आहेत. या यात्रेत आदित्य ठाकरे लोकसभेत मतदान केलेल्या जनतेचे आभार मानायला आले आहेत, तर ज्यांनी मतं दिली नाहीत त्यांची मन जिंकायला आले आहेत. आज आदित्य ठाकरे अहमदनगर दौऱ्यावर आहेत. अहमदनगर येथे आले असता आदित्य ठाकरेंनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांना अप्रत्यक्षरित्या फटकारले आहे. काही नेत्यांना राज्यातील तरुणांची माहितीच नसल्याचं ठाकरे म्हणाले.
माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे. मात्र काही नेत्यांना राज्यातील तरुणांची माहिती नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. थोरातांनी जन आशीर्वाद यात्रेवर मिश्किल टीका करत आदित्य ठाकरे कॉलेजच्या वयाचे असल्याचं म्हटलं होतं. त्यावर आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
आदित्य ठाकरेंच्या या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर आदित्य ठाकरेंची ही यात्रा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरत आहे. या यात्रेत शिवसनेने नवीन नारा दिला आहे. आदित्य ठाकरेंनीचं पुरोगामी महाराष्ट्राच नेतृत्व कराव अशी मग्न शिवसैनिकांनी केली आहे. याबाबत अहमदनगर येथे देखील आदित्य ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री कोणाला बनवायचं यासाठी जन आशीर्वाद यात्रा नाही. तर शेतकरी, धनगर, विद्यार्थी, महिला यांच्या मनात काय आहे ते जाणून घेण्यासाठी ही यात्रा असल्याचं सांगितलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

