Share

‘हा’ खेळाडू म्हणजे भारताला युवराज आणि धोनीचा पर्याय मिळाला – गौतम गंभीर

Published On: 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीनंतर संघातील त्याची पोकळी जाणवत असल्याच अनेकदा बोलल जात. याचबरोबर धोनीच्या चाहत्यांना देखील धोनीला खेळताना बघता येणार नसल्याने नाराजी व्यक्त करत असतात. कॅप्टन कूल एम. एस. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण आजही चाहते आणि खेळाडू धोनीला विसरले नाहीत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि कोच यांनी सामन्यात धोनीबद्दल वक्तव्य केल्याचं ताजं असतानाच आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. भारतीय क्रिकेट संघाने 195 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा टी-20 सामना जिंकला. अखेरच्या ओव्हरमध्ये 14 धावांची गरज होती आणि हार्दिक पांड्याने फिनिशरची भूमिका निभावली. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचा असा विश्वास आहे की हार्दिक असा फलंदाज आहे जो कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करू शकतो.

माजी भारतीय दिग्गज महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांच्यासारखा फलंदाज म्हणून गंभीरने हार्दिकचे वर्णन केले. गंभीर म्हणाला की, ‘हे दोन्ही फलंदाज पूर्वी टीम इंडियासाठी फिनिशरची भूमिका निभावत असत, हार्दिकमध्ये आज तितकीच क्षमता आहे. हार्दिकचा खेळ कायम राहिल्यास अखेरच्या ओव्हरमध्ये तो 20 ते 25 धावा करून भारताला जिंकवू शकतो.’

एका इंग्रजी वेबसाईटवर बोलताना गंभीर म्हणाला की, हार्दिक पांड्यासारखे मोजकेच खेळाडू आहेत, त्याआधी भारताकडे युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी होते. ऑस्ट्रेलियाकडे ग्लेन मॅक्सवेल आहे. ते कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करू शकतात. यासाठी ते सक्षम आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये जर 20 ते 25 धावांची गरज भासली तरी हे खेळाडू आपल्याला आत्मविश्वास देतात की ते हे साध्य करू शकतात.सामन्यानंतर हार्दिक म्हणाला की, मला स्कोअर बोर्ड फिरताना पाहणे आवडते. यामुळे कळतं तुम्हाला कोणता शॉट खेळायचा आहे आणि तुमच्याकडे कोणते पर्याय आहेत. मी बर्याचदा या परिस्थितीत आलो आहे. मी भूतकाळातील चुकांमधून शिकलो आहे. माझा खेळ नेहमी माझ्या आत्मविश्वासामुळेच असतो. मी तो नेहमीच पार पाडतो. मला माझ्यावर विश्वास आहे. त्याला अति आत्मविश्वास ही मानले जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!