🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहेत. त्यानुसार भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाचं लावला आहे.
अशातच मालेगावात कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मालेगावचे आमदार आसिफ शेख हेही आता कॉंग्रेसला सोडचिट्ठी देण्याच्या तयारीत असल्याच चित्र आहे. कारण आरिफ शेख यांनी काढलेल्या रॅलीमध्ये काँग्रेसच्या झेंड्या ऐवजी त्यांनी पांढरा झेंडा घेऊन रॅली काढली त्यामुळेच ते लवकरच कॉंग्रेसला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.
दरम्यान, आज कॉंग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सत्तार यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये कॉंग्रेस अजूनच कमकुवत झाली आहे. आणि आता शेख हेही पक्ष सोडणार असल्याने कॉंग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसमधून आतापर्यंत भाऊसाहेब कांबळे, अब्दुल सत्तार, जयकुमार गोरे, दिलीप माने यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे.
- दरवर्षी श्रावण-भाद्रपदात अर्थव्यवस्थेत मंदी येते : मोदी
- वंशाच्या दिव्यापेक्षा मुलीच बऱ्या ;सुप्रिया सुळेंंचा राणा पाटलांना टोला
- कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करायची : शरद पवार

