🕒 1 min read
अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाचा ८ गडी राखुन पराभव केला. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने ७७ धावांची खेळी करत भारतीय संघाचा डाव सावरला. मात्र तरीही भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने या पराभवाला कोहलीला जबाबदार धरले आहे.
तिसऱ्या टी-२० सामन्यात सुर्यकुमार यादवला संघाबाहेर केल्यामुळे गंभीर नाराज झाला. एखादा खेळाडू जर पदार्पण करत असेल तर त्याला किमान सलग तीन-चार संधी दिली पाहिजे असे गंभीर म्हणाला. इशान किशनने पदार्पणातच अर्धशतक झळकावले आणि पुढच्याच सामन्यात त्याला तुम्ही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवता. हे खुपच दुर्भाग्यपुर्ण होते.
एखादा खेळाडू जर पदार्पण करत असेल तर किमान तीन-चार सामन्यात संधी मिळाली तर तो खेळाडू कोणत्या स्थानावर खेळु शकतो हे ठरवता येते. जर एखादा खेळाडू जखमी झाला तर सुर्यकुमार कडे आंतरराष्ट्रीय स्तराचा काय अनुभव आहे? श्रेयस अय्यरच्या जागी बदली खेळाडू संघात उपलब्ध नाहीए. जुन्या खेळाडूंना आणखी किती दिवस संधी देणार असा प्रश्नही गंभिरने उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या
- वेदनेने विव्हळत अखेर ‘त्याने’ घाटीच्या पायरीवर सोडला प्राण
- ‘स्व.गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडाला सक्षम केले हा पंकजांचा गैरसमज’, नामदेव शास्त्री महाराजांची टीका
- मद्यधुंद महिलेचा रस्त्यावर धिंगाणा…पोलिसांनी हटकले तर पकडली पोलिसाची कॉलर
- पुण्यात लागणार संपूर्ण लॉकडाऊन ? महापौरांचे मोठे विधान म्हणाले…
- कोरोनाच्या पाश्वभूमीवर ‘ही’ क्रिकेट स्पर्धा स्थगित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
