🕒 1 min read
मुंबई :- राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातील मंदिरे मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. परंतु आता दिवाळीच्या पाडव्यापासून म्हणजेच येत्या सोमवारपासून राज्यातील मंदिरांसह सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरु झाल्याने राज्यातील मंदिरेही खुली करावीत अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. याची दखल घेत अखेर ठाकरे सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
मंदिरे सुरू करण्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला महत्त्वाचे आवाहनही केले आहे. मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील, असे त्यांनी नागरिकांना सांगितले.
महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव-देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मियांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच.
कोरोनाच्या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतः बरोबर इतरांचे रक्षण करा, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- वर्षानुवर्षे ज्यांनी आरक्षण घेतलं आणि प्रगती केली त्यांनी आता आरक्षण सोडायला हवं : संजय राऊत
- …अन आईच्या आठवणीने शरद पवार गहिवरले !
- शिर्डीच्या साईबाबा देवस्थानच्या योग्य व्यवस्थापनासाठी तुकाराम मुंढेची गरज!
- ‘या’ डेअरीने दिला शेतकऱ्यांना दिवाळी बोनस, सौभाग्यवतींना पैठणी आणि फराळाचं गिफ्ट!
- बिहारमधील फडणवीसांच्या कामगिरीनंतर भाजपने राज्यातील नेत्यांकडे सोपवले ‘या’ राज्यांचे नेतृत्व
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

