Share

शिर्डीच्या साईबाबा देवस्थानच्या योग्य व्यवस्थापनासाठी तुकाराम मुंढेची गरज!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- शिर्डीचे साईबाबा यांचे नाव देशासह जगभरात लौकिक असून, साईबाबांचा भक्त परिवार सर्वत्र आहे. त्यामुळेच साईबाबा देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या संदर्भात पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना याबाबत मागणीचे निवेदन पाठविले आहे.

आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री तसेच संबंधितांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुकाराम मुंढे देवस्थानला शिस्त लावतील. संस्थानजवळ सुरू असलेले राजकारण रोखतील, त्यामुळे शिर्डी बरोबरच नगर जिल्ह्याचाही विकास होऊ शकेल. देवस्थानाच्या वतीने सरकारला मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. मात्र शिर्डीत येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्यात शिर्डीतील व्यवस्था अपुरी पडते. संस्थानला मिळणाऱ्या निधीपैकी योग्य तो निधी वापरून शिर्डीत येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी तुकाराम मुंढे यांची शिर्डीला गरज आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

शिर्डी हे जागतिक दर्जाचे देवस्थान आहे. दरवर्षी करोडो रुपयांच्या देणग्या देवस्थानला जमा होतात. सरकारने ठरवून दिलेल्या नियमानुसारच देवस्थानचे काम होणे अपेक्षित असताना तेथे राजकारण होते, असा आरोप कायम केला जातो. देशभरातून येणारे भाविक साई संस्थानला मोठ्या देणग्या देतात. काही भाविक करोडो रुपयांच्या देणग्या देतात. या देणग्यांचा वापर योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. भाविकांचा एक रुपयाही मोलाचा असतो. त्यामुळे देवस्थान विश्वस्त मंडळांनी त्याचा जपून वापर करावा, यासाठी सक्षम अधिकारी असावा, अशी अपेक्षा भाविकांमधून होत आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!