🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राहुरी तालुक्यातील महालगाव येथे गोधन डेअरी फार्म आहे. ज्योती चौरे यांनी हा प्रकल्प सुरू केला असून या प्रकल्पातील दूध थेट गुजरातमध्ये अमूल डेअरीला जात असल्याने ना नफा ना तोटा या तत्त्वावर ही डेअरी उभी करण्यात आली आहे. आता गोधन डेअरीच्या वतीने वर्षभर कुठलीही कपात न करता प्रतिलिटर दीड रुपयाप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात आला आहे.
आजूबाजूच्या परिसरात गोधन डेअरीच्या या कामगिरीची जोरदार चर्चा आहे. याशिवाय डेअरीतर्फे बळीराजाला मदत करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवतींना पैठणी व दिवाळी फराळ देण्यात आला असून गोधन डेअरीने बळीराजाला दिलेल्या या गिफ्टमुळे त्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.
एका बाजूला शेतकरी अडचणीत आल्याने युवक शेतीत रस घेत नाही, मात्र जर संस्था सक्षम असल्या तर युवक शेतीकडे वळतील, असा विश्वास डेअरीचे संचालक अभिजित चौरे यांनी सांगताना युवकांना शेती करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. गोधन डेअरीने यावर्षी दुधाला उत्तम भाव देत त्यांनी बळीराजाचा विश्वास संपादन केला, मात्र कुठलीही कपात न करता प्रतिलिटर १ रुपया ५२ पैसे प्रमाणे रिबीट देण्यात आले आहे. याशिवाय बळीराजाला साथ देणाऱ्या सौभाग्यवतींना पैठणीसुद्धा देण्यात आली आहे. सहकारी संस्था वर्षभर कपात करत रिबीट देण्याची पद्धत असताना दुसरीकडे गोधन डेअरी फार्मच्या वतीने करण्यात आलेला उपक्रम बळीराजाला मदत करणारा आहे.
गोधन डेअरीकडून कुठलीही कपात न करता प्रतिलिटर १ रुपया ५२ पैसे प्रमाणे रिबीट देण्यात आले असून याशिवाय बळीराजाला साथ देणाऱ्या सौभाग्यवतींना पैठणीसुद्धा देण्यात आल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात गोधन डेअरीच्या या कामगिरीची जोरदार चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या –
- वर्षानुवर्षे ज्यांनी आरक्षण घेतलं आणि प्रगती केली त्यांनी आता आरक्षण सोडायला हवं : संजय राऊत
- …अन आईच्या आठवणीने शरद पवार गहिवरले !
- शिर्डीच्या साईबाबा देवस्थानच्या योग्य व्यवस्थापनासाठी तुकाराम मुंढेची गरज!
- ‘विरोधकांच्या अघोरी प्रयत्नांना पुरून सरकारने वर्षपूर्ती केली’; संजय राऊतांचा भाजपला टोला
- बिहारमधील फडणवीसांच्या कामगिरीनंतर भाजपने राज्यातील नेत्यांकडे सोपवले ‘या’ राज्यांचे नेतृत्व
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

