Share

वर्षानुवर्षे ज्यांनी आरक्षण घेतलं आणि प्रगती केली त्यांनी आता आरक्षण सोडायला हवं : संजय राऊत

Published On: 

मुंबई : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने ‘शट अप यार कुणाल’ या पॉडकास्ट मध्ये घेतलेली बहुप्रतीक्षित मुलाखत अखेर प्रदर्शित झाली आहे. कुणाल कामरा याने राऊतांनी आपल्या मुलाखतीत यावं असं म्हटलं होत. यानंतर, कंगना रानौत आणि शिवसेना यांच्यात वाद सुरु असतानाच त्यांनी मुलाखतीचं निमंत्रण स्वीकारत कुणालला मुलाखत दिली होती.

महाविकास आघाडी सरकार स्थापनेमध्ये राऊतांची असलेली महत्वाची भूमिका, लॉकडाऊन काळात शरद पवारांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत, सुशांत प्रकरण, भाजप-कंगनाचे आरोप यावर संजय राऊत आपली काय भूमिका मांडणार यासोबतच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेला कुणाल काय प्रश्न विचारून फिरकी घेणार! यावरून चांगलीच उत्सुकता लागली होती.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना म्हटलं की, ‘या सरकारच्या गोष्टी आहेत. मराठा आरक्षण प्रकरण सु्प्रीम कोर्टात आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल. मात्र जातीय आधारावर आरक्षण नसावं अशी भूमिका दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उघडपणे घेतली होती. ‘ अशी आठवण देखील त्यांनी सांगितली.

तर, ‘व्यक्ती कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो, गरीब गरजू नागरिकांना आरक्षण मिळायला हवं ही बाळासाहेबांची भूमिका होती. मागासवर्गींयांमध्ये वर्षानुवर्षे ज्यांनी आरक्षण घेतलं आणि प्रगती केली त्यांनी आता आरक्षण सोडायला हवं, ‘असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!