Share

‘ज्यांनी कायम यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर केला त्याच पाळतखोर मंडळींचा हा आकांडतांडव’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : संसदेचं मान्सून सत्र सुरु आहे आणि पहिल्याच दिवशी भारतीयांच्या हेरगिरीच्या प्रकरणावर विरोधकांनी रान उठवले आहे. एक नाही दोन नाही तर तब्बल तीनशे भारतीयांची हेरगिरी केंद्र सरकारनेच केल्याचा दावा केला जातोय.इस्त्रायलच्या एनएसओ या फर्मवेअरने तयार केलेलं पेगासेस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. इस्रायली फर्म पेगाससद्वारे आपल्या देशातील काही मंत्री तसंच पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आले असल्याचा दावा करण्यात येतोय.

पेगासस हे एक स्पायवेअर आहे. इस्त्रायलच्या NSO ग्रुपने हे स्पायवेअर बनवलं आहे. हे स्पायवेअर ज्यांच्या फोनमध्ये टाकण्यात आल्याची शक्यता असलेल्यांची एक यादी सध्या लीक झाल्याची माहिती आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगासेस सॉफ्टवेअर हॅकिंग प्रकरणावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. तुमच्या फोनमधील ते काय वाचत आहेत आम्हाला माहीत आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

दरम्यान, याप्रकरणावरून राज्यातील भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.  यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले आहे. ‘9 हजार फोन आणि ५०० इमेल खाती यांवर काँग्रेसचे नेत्तृत्व असलेल्या UPA मध्ये पाळत ठेवली जात होती. प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना त्यांच्या कार्यालयात नजर ठेवण्यात आली, ज्यांनी कायम यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर केला हीच पाळतखोर मंडळी आकांडतांडव करीत आहेत,’ असे ट्विट करत केशव उपाध्ये यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

दरम्यान, याच प्रकरणाचे पडसाद आज संसदेतही पाहायला मिळाले. मोदी सरकारमध्ये नवनिर्वाचित माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संबंधित आरोप आणि अहवालावर सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ‘काल रात्री एका वेबपोर्टलद्वारे एक खळबळजनक वृत्त प्रसारित करण्यात आलं. यात अनेक आरोप करण्यात आले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच हे असे अहवाल प्रकाशित होतात हा काही योगायोग असू शकत नाही’, अशी रोखठोक भूमिका अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत मांडली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!