मुंबई : अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने शनिवारी रात्री मुंबईच्या समुद्रात सुरू असणाऱ्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली. यावेळी दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. एनसीबीने याठिकाणाहून अंमली पदार्थांचा साठाही जप्त केले होते. त्यानंतर एनसीबीने आर्यनची कसून चौकशी केल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर अटक झाली आहे. त्याच्यासोबत इतर दोघांना एनसीबीने अटक केली आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे राज्यासह देशभरात खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने कडक निर्बंध लाऊनही वारंवार अशा पार्टी होत असल्याचे समोर येत असल्याने सरकार आणि पोलिसांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका होत आहे. भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बदललेला हा नवा भारत आहे. इथे गुन्हेगारांना शोधून दंड दिला जातो मग तुमचा बाप कोणीही असो. सुदैवानं एनसीबी ठाकरे सरकारच्या अखत्यारीत येत नाही, नाहीतर रातोरात ‘त्या’ची ‘मन्नत’ पूर्ण झाली असती असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातून एनसीबीने आर्यनला अटक केली आहे. एनसीबी अधिकारी आर्यनला आता मुंबईच्या जे जे रुग्णालयात मेडिकलसाठी घेऊन गेले आहेत. तिथे त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे आर्यनने स्वत: आपल्या लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वैद्यकीय चाचणीनंतर आर्यनला मुंबईत न्यायालयात हजर केलं जाणार आहे. एनसीबीने आर्यन खान आणि अरबाज मर्चंट या दोघांना अटक केली आहे. एनसीबीने आर्यनसह एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नगरमध्ये उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाची आत्महत्या
- ‘शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळलेय, सुलतानी संकट टाळा’, पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- ‘अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये शिवसेना संपविण्याचे काम केले’, सुभाष साबणेंचा आरोप
- ‘देशमुख व परमबीरपैकी एकाला ‘वर्षा’वर तर दुसऱ्याला ‘मातोश्री’वर लपवलेय!’, सोमय्यांचा गंभीर आरोप


