औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील बनशेंद्रा शिवारातील गट नंबर १६० शेतात आज शुक्रवारी दुपारी एक वाजेदरम्यान बिबट्या आढळून आला आहे. बिबट्या आठळल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण झाले आहे.
गट नंबर १६० मधील शेतात शुक्रवारी महेश मोतींग हे पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यांच्यावर अचानक बिबट्याने मागून हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. त्यानंतर शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्यावर आजूबाजूचे शेतकरी आणि गावकरी जमा होऊन संबंधित वनविभागातील वनपाल प्रवीण कोळी यांनी घटनेबाबात माहिती दिली. या वर वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. मागच्या वर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे परिसरातील शेतकरी शेतातील पिकांना शेतात जात आहेत. तर या बाबत वनविभागाने लवकरात लवकर या वर उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून होत आहे.
त्यानंतर प्रवीण कोळीसह वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील कार्यवाही सुरू केली. जखमी महेश मोतींग यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे. वन विभागाने लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यंकडून होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- परमबीर सिंह हे भाजपचे डार्लिंग झाले आहेत; राष्ट्रवादीच्या नेत्याची बोचरी टीका
- पुण्यात उद्यापासून मिनी लॉकडाऊन, दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी…
- ‘ “आधारवड” पवारांचा हॉस्पिटलमध्ये मुक्काम, तरीही त्यांची देशासह राज्यातील घडामोडींवर बारीक नजर’
- ‘प्रिय EC, माजरा क्या है ?’ भाजप नेत्याच्या गाडीत ईव्हीएम सापडल्यानंतर प्रियांका गांधींचा सवाल
- Breaking : पुण्यात लॉकडाऊन नाहीच, मात्र ‘हे’ असणार कडक निर्बंध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

