मुंबई : येत्या ९ एप्रिल पासून आयपीएलचे १४वे सत्र सुरु होत आहे. सर्व संघ स्पर्धेच्या तयारीला लागले आहे. यंदाच्या आयपीएलचा सलामीचा सामना हा आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. मात्र आयपीएल सुरु होण्यापुर्वीच काही संघाना काही धक्के बसले आहेत. त्यात दिल्ली कॅपीटलचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्याला मुकणार आहे.
मात्र, यादरम्यान श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्लीचे कर्णधारपद कोणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरु होत्या. मंगळवारी आखेर या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. दिल्ली कॅपीटलने त्याच्या नव्या कर्णधारपदी भारताचा धडाकेबाज युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतची निवड केली आहे.
श्रेयस अय्यरवर ८ एप्रिलला शस्त्रक्रिया होणार आहे. नुकतीच भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका पार पडली. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयसच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांत खेळता आले नाही. तसेच तो आयपीएलला देखील मुकणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- परमबीर सिंह हे भाजपचे डार्लिंग झाले आहेत; राष्ट्रवादीच्या नेत्याची बोचरी टीका
- पुण्यात उद्यापासून मिनी लॉकडाऊन, दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी…
- ‘ “आधारवड” पवारांचा हॉस्पिटलमध्ये मुक्काम, तरीही त्यांची देशासह राज्यातील घडामोडींवर बारीक नजर’
- ‘प्रिय EC, माजरा क्या है ?’ भाजप नेत्याच्या गाडीत ईव्हीएम सापडल्यानंतर प्रियांका गांधींचा सवाल
- Breaking : पुण्यात लॉकडाऊन नाहीच, मात्र ‘हे’ असणार कडक निर्बंध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

