🕒 1 min read
मुंबई : सिटी बॅंक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. आमदार रवि राणा यांच्या तक्रारीनंतर ईडीने अडसूळ यांना समन्स पाठवले आहे. त्यानंतर ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहचले होते. दरम्यान प्रकृती खालावल्याने आनंदराव अडसूळ यांना स्ट्रेचवरुन बाहेर आणण्यात आलं आणि नंतर रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं होतं. या कारवाईवरुन काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा प्रहार केला आहे.
या संदर्भात बोलत असतांना वडेट्टीवार म्हणाले की,’महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी या कारवाया सुरु आहेत. हे विरोधकांनी रचलेलं षडयंत्र आहे. खासदार नवनीत राणा यांच्या जात पडताळणीबाबत कारवाई झाली. त्यामुळे त्यांनी अडसूळ यांच्या विरोधात तक्रार दिली. पण हे सरकार आता फेविकॉलचा जोड बनलं आहे. त्यामुळे काही फरक पडणार नाही, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय. सुपारी घेऊन काही लोक काम करतात. ती सुपारी चघळली जात नाही तोपर्यंत ते काम करणार’ असेही ते म्हणाले.
दरम्यान, अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत ९०० कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी आज त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवले होतते. तसेच सकाळीच ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आनंदराव अडसूळ यांना ज्या प्रकरणात ईडीने समन्स पाठवलं ते प्रकरण नेमकं आहे तरी काय ?
- मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात, इंदोर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले
- पश्चिम महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानाच्या उपयोगातून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – नितीन गडकरी
- ‘अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या अवमानाची…’, मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचे खळबळजनक वक्तव्य
- धर्मांतर रॅकेट : नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला ATSने नाशकातून केली अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
