🕒 1 min read
अहमदनगर : दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा आज (13 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडत आहे.
या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित आहेत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच विविध पक्षाचे मान्यवर प्रवरानगर येथे कार्यक्रमस्थळी उपस्थित आहेत.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब विखे पाटलांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘713 पानांचं आत्मचरित्र म्हणजे शेती, सहकार, चिंतन, राजकारण आणि मानवी मूल्य यांचा आरसा दाखवणारा हा ग्रंथ आहे. बाळासाहेब हे भेदभाव रहीत राजकारण करणारे राजकारणी होते. शेतीत सातत्यानं प्रयोग करून, शेतकऱ्यांना आधार देणारे लोकप्रतिनिधी होते. त्यांनी पहिली सर्वपक्षीय पाणीपरिषदही विखे यांनी भरवली होती. बाळासाहेब हे पश्चिमी वाहिन्यांचं पाणी वळवून, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या नियोजनाचे जनक आहे, असं फडणवीस म्हणाले.
“हे आत्मचरित्र नाही तर राजकारण, मानवी जीवन मूल्य, शेती आणि सिंचनाचं शिक्षण देणारा हा ग्रंथ आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाचलाच पाहिजे. सर्वांना दिशा देईल अशा ग्रंथाचे प्रकाशन आज होत आहे,” असे देखील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तर “देशात अनेक लोक खासदार होतात, काम करतात. काही काळानंतर तो प्रत्येक व्यक्ती खासदार माजी होतो. पण बाळासाहेब विखे-पाटील हे आजन्म खासदार राहिले. आजही त्यांचा उल्लेख खासदार असाच होतो,” असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
- बेजबाबदार मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिरसह ३८ जण कोर्टात
- गटार स्वच्छ होतंय तर यांना त्रास का होतोय ?
- धक्कादायक! राज्यात तब्बल साडे 12 लाख सदोष RTPCR किट्स वितरित,टोपेंची कबुली
- जाणून घ्या राज्यात कोरोना रुग्णांची पाच अंकी संख्या घटून झाली चार अंकी झाली का ?
- महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही; पाटील यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
