🕒 1 min read
जम्मू-काश्मीर : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आणि पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी शनिवारी दोन नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी भाष्य केले.
रविवारी यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधतांना ते म्हणाले की,’केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच झालेल्या नागरी हत्यांमध्ये काश्मिरींचा सहभाग नाही. काश्मिरींना बदनाम करण्याच्या षडयंत्राखाली हे हल्ले करण्यात आले. यावेळी त्यांनी या घटनांना केंद्रशासित प्रदेशातील शांततामय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हंटले. तसेच ते म्हणाले की,’या हत्या दुर्दैवी आहेत आणि एका षडयंत्राखाली केल्या आहेत. काश्मिरी लोक या हत्यांमध्ये सामील नाहीत. हा काश्मिरींना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे’. भारत आणि पाकिस्तान यांच्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चेबद्दल विचारले असता ‘मैत्रीकडे नेणारा कोणताही उपक्रम स्वागतार्ह आहे’ असे ते म्हणाले. तसेच आम्ही प्रार्थना केली पाहिजे आणि आशा केली पाहिजे की दोन्ही देशांमध्ये मैत्री आहे आणि आम्ही जगू शकतो’, असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आणि पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी शनिवारी दोन परप्रांतीय नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केली. २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अल्पसंख्यांक समुदायाच्या चार नागरिकांसह एकूण सात नागरिकांची हत्या केली, त्यामुळे आसपासच्या परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झाले असून राजकीय पक्षांकडून सुरक्षा यंत्रणेवर टीका केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कमी प्रतिच्या गांजामुळेच विरोधकांची बेताल बडबड – संजय राऊत
- ‘ठाकरे-पवार सरकार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोरा’चे घोटाळेबाज सरकार’, किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
- ‘ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते आज त्यांच्याच कौतुकाचा तुणतुणा वाजवण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे
- जातीयवादी टिप्पणी प्रकरणी युवराज सिंगला अटक आणि जामीनही…
- ‘पडद्यामागची वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे’, केशव उपाध्येंचा प्रतिटोला

