पुणे : स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुणे महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेने स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी मोफत कोचिंग क्लासेस सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिकेने घेतलेल्या या निर्णयातून केंद्रीय लोकसेवा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहयोगाने महानगरपालिका हे कोचिंग सेंटर चालवणार आहे. या कोचिंग क्लासेसमध्ये 150 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या सेंटरमधून यूपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यावर 17 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
या सेंटरमध्ये एकूण 150 विद्यार्थ्यांची बॅच असेल. यामध्ये राखीव गटातून 100 विद्यार्थी असतील. खुल्या गटातून 50 विद्यार्थी निवडणार असून विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. महानगरपालिकेच्या सामाजिक विभागाकडून या कोचिंग सेंटरच्या समन्वयाचे काम पाहिले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या सेंटरद्वारे विद्यार्थ्यांवर असलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचंही पालिका अधिकारी म्हणाले आहेत.
दरम्यान, मोफत कोचिंग सेंटरच्या या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत नुकतीच मान्यता मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार या सेंटरमध्ये अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने याने यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘साखर सम्राटला बदनामीचा शिक्का लागतो तसा शिक्का शिक्षण सम्राटला लागणं योग्य नाही’
- मोदींच्या विरोधात सक्षम चेहरा नाही असं म्हणता येणार नाही- शरद पवार
- या भेटीच्या निमित्ताने इतिहासाच्या जवळ जाता आलं; केदार शिंदे भावूक
- क्रिप्टोकरन्सीबाबत घेणार मोठा निर्णय; पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक
- ‘कंगनाने केलेलं वक्तव्य जर एखाद्या मुस्लिमाने केले असते तर…’, ओवैसींचा हल्लाबोल


