Share

‘कंगनाने केलेलं वक्तव्य जर एखाद्या मुस्लिमाने केले असते तर…’, ओवैसींचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

नवी-दिल्ली : ‘भारताला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’,अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रणौतने एका कार्यक्रमात उधळली होती. कंगनाच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तिचा निषेध करण्यात येत आहे. तसेच तिला मिळालेले पुरस्कार परत घ्यावेत अशी देखील मागणी होताना दिसत आहे. दरम्यान, कंगनाच्या या वक्तव्यावर एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसींनी संताप व्यक्त केला आहे.

यासंदर्भात बोलतांना ओवैसी म्हणाले की,’ती ‘क्वीन’ आहे आणि तुम्ही इथले राजे आहात, त्यामुळे तिच्यावर तुम्ही कारवाई करणार नाही. बाबांनी तर टी २० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत काही बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरूंगात टाकले होते. योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्या भारतीयांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कंगनावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल का?, देशद्रोहाचा गुन्हा फक्त मुस्लिमांवरच लागू होतो का?’ असे प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्री योगी आणि पंतप्रधान मोदींना विचारले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कंगना रणौतला तिच्या चित्रपटातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कंगनाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर कंगनाने ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने एक वादग्रस्त वक्तव्य केले. ‘देशाला १९४८ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वांतत्र्य नसून ती भीक होती. आपल्याला खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळाले. देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. मी आता राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते. सैन्यदलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीच्या प्रचाराबद्दल काम करते. पण त्यावेळी लोक मला मी भाजपचा अजेंडा चालवत आहे, असे सांगतात. तसेच या मुद्द्यावरुन मला भाजपसोबत जोडलं जाते. पण हे सर्व मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात? हे तर देशाचे मुद्दे आहेत.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!