🕒 1 min read
नवी दिल्ली : सध्या जगभरात क्रिप्टोकरन्सीबाबत क्रेझ मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्याच सोबत आता देशातही गुंतवणूक, ट्रेडिंग आणि क्रिप्टोकरन्सी या बाबत मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सीबाबत लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शनिवारी एक बैठक देखील बोलावण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
शनिवारी झालेल्या या बैठकीत आरबीआय, अर्थ मंत्रालय त्याच सोबत गृह गृहमंत्रालयाने क्रिप्टोकरन्सी व त्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या ट्रेडिंगवर चर्चा केली आहे. इतर देशांमध्ये कशा पद्धतीने यावर काम केले जाते या बद्दल जगभरातील तज्ञांकडून सल्ले देखील घेण्यात आले आहेत. देशात वाढत असलेली क्रिप्टोकरन्सीची क्रेझ आणि गुंतवणूक या गोष्टी लक्षात घेऊन लवकरात लवकार यावर धोरण ठरवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
क्रिप्टोकरन्सी फक्त एका देशाच्या सीमा किंवा नागरिकांपुरती मर्यादित नसून, ती विविध देश आणि नागरिकांशी संबंधित गोष्ट असल्याने, त्यासाठी जागतिक भागीदारी आणि सामूहिक धोरणांचीही आवश्यकता असेल, असे या बैठकीत नमूद करण्यात आले. त्याच सोबत या संदर्भात दिशाभूल करणाऱ्या अनेक जाहिराती प्रसिद्ध होत असतात त्यापासून सावध राहण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कंगनाने केलेलं वक्तव्य जर एखाद्या मुस्लिमाने केले असते तर…’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘पुरंदरे वादग्रस्त पवारांसाठी असतील आमच्यासाठी नाही’, भाजपचा पलटवार
- ‘आम्ही जुळवून घ्यायचं ठरवलंय, तुम्ही दिवस मोजत बसा’
- विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर यशोमती ठाकूर यांचा निषेध
- अन्यायाविरोधात लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही- शरद पवार

