Share

या भेटीच्या निमित्ताने इतिहासाच्या जवळ जाता आलं; केदार शिंदे भावूक

Published On: 

पुणे : ज्येष्ठ इतिहासकार पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना आज पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरेंची प्राणज्योत मालवली. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर अनेक राजकीय नेत्यांनी तसेच कलाकारांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेता तसेच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी देखील आपल्या ट्विटवरून बाबासाहेब पुरंदरे याना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘या भेटीच्या निमित्ताने इतिहासाच्या जवळ जाता आलं, हेच भाग्य समजतो. विनम्र अभिवादन आणि मुजरा शिवशाहीर बाबासाहेब. असं केदार शिंदे म्हणाले.

दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जात आहेत. पोलिसांकडून बाबासाहेब पुरंदरेंना अखेरची मानवंदना देण्यात येत आहे. यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी राजकीय नेते तसेच कलाकारही उपस्थित होते. यावेळी त्यांनी हळहळ व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!