पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजला. यावरून विरोधकांनी रान पेटवले होते. भारतीय जनता पक्षाने एमपीएससीच्या रखडलेल्या प्रक्रियेवरून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले होते. यावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५ जुलै रोजी विधानसभेत एमपीएससीची सर्व रिक्त पदे ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्याची घोषणा केली होती.
विधिमंळात केलेल्या घोषणेला कायदेशीर महत्व प्राप्त होते. दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उपमुख्यमंत्र्यांना या घोषणेचा विसर पडला आहे का ? असा संतप्त सवाल स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी उपस्थित केला जात आहे. तर विरोधकांनी देखील टीकास्त्र डागलेले आहे. ‘अजित पवारांसारखा वेळ पाळणारा आणि शब्दाला जागणारा दुसरा माणूस नाही अशी ओळख आहे. पण आता एमपीएससीच्या जागा भरण्याबाबत विधिमंडळात दिलेला शब्द जर ते फिरवत असतील तर मग कठीण आहे,’ अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांना जोरदार टोला लगावला आहे.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले कि, ‘उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधिमंडळ ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आता ते जर आपण दिलेल्या शब्दावरून पलटी मारत असतील तर मग कठीण आहे. असे प्रत्येक विषयातच त्यावेळची वेळ मारून नेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने सुरु आहे. हे अत्यंत खोटारडं सरकार आहे. निवडणूक होईपर्यंत हे सर्व चालतं, पण नंतर कळतं. महाविकास आघाडी सरकारला लोक धडा शिकवतील.’ असा घणाघात देखील त्यांनी यावेळी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी मोदींची परवानगी घ्यावी लागेल’, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
- ‘लांब फेकणारा खेळाडू टोकियोला गेला नाही, त्यामुळे भारताने गोल्डन संधी गमावली’, काँग्रेसचा टोला
- ‘शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन, ड्रायव्हिंगशिवाय येतंय काय? मग शरद पवारांनी कौतूक केले कशाचे?’
- बीसीसीआयचा पीसीबीला असाही झटका, पाकविरुद्धची मालिका सोडून खेळाडू खेळणार आयपीएल
- खुशखबर! इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील खेळपट्टी फिरकीपटूसाठी पोषक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
