औरंगाबाद-एमआयएम पक्षाला बदनाम करण्यासाठी काही राजकीय मंडळी जाणीवपूर्वक अरुण बोर्डे यांना अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप खा.इम्तियाज जलील यांनी केलाय. यासंदर्भात त्यांनी शनिवारी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
काही वृत्तपत्रांनी अरुण बोर्डे आणि एमआयएम संबंधित छापलेल्या बातम्या चुकीच्या आहेत. यासंदर्भात आपण कारवाई करणार असल्याचा इशाराही खा. जलील यांनी यावेळी दिला. पक्षाला बदनाम करण्यासाठीच अशाप्रकारे आरोप करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितलं. यासंदर्भात एमआयएम पूर्णपणे पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावर भाष्य
यावेळी जलील यांनी औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरही भाष्य केले. दर वेळी निवडणुकीच्या तोंडावर संभाजी महाराजांच्या नावाचा वापर होतो. शिवसेना आणि भाजप राजकारणासाठी या नावाचा वापर करतात. निवडणुका आल्या की शहरात तेढ निर्माण करणाऱ्या अशा मुद्द्यांची चर्चा केली जात असल्याचा आरोप देखील इम्तियाज जलील यांनी यावेळी केला. यासंदर्भात देखील आपण पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईच्या विभाजनाचा काँग्रेसचा डाव; भाजप नेत्याचा हल्लाबोल
- वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे देशभरात निर्माण व्हावीत – उद्धव ठाकरे
- महाराष्ट्र कोरोना लसीकरणासाठी सज्ज, राजेश टोपेंनी दिली लसीकरणाबाबत माहिती
- ‘भाजप कर्मकांडातच व्यस्त’, मित्रपक्षाकडून भाजपला टोला
- संभाजी महाराजांच्या नावाचा फलक फाडणाऱ्याला तात्काळ अटक करा – सचिन खरात


