Share

हा एक प्रकारचा कबुलीजबाब आहे, महाराष्ट्राच्या बदनामीच्या कटाचा सूत्रधार भाजप : सचिन सावंत

Published On: 

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि कंगना राणावत यांच्यातील ट्विटर वॉर हे काही नवीन नाही, पण या वादाला आता नवीन वळण मिळाले आहे. या वादात आता काँग्रेसने उडी घेतली आहे. नुकतीच उर्मिला मातोंडकर यांनी नवीन कार्यालय खरेदी केले आहे. त्यांनी तीन कोटींचे नवीन कार्यालय घेतले आहे. यावरच कंगना रनौतने तिच्या नवीन ऑफिसला लक्ष्य केले. कंगनाने एक व्हिडिओ ट्विट केला. व्हिडिओ सोबत कंगनाने उर्मिलाला चांगलेच वेठीस धरले होते. भाजपला पाठिंबा देऊन माझा काही उपयोग नाही, पण कॉंग्रेसमुळे उर्मिलाला खूप फायदा झाला आहे.

ट्विटमध्ये मध्ये कंगनाने लिहिले होते की, ‘उर्मिला जी मी स्वत: च्या मेहनतीने घरे बांधली होती, कॉंग्रेस त्यांना तोडत आहे. भाजपाला खुश करण्यासाठी माझ्यावर फक्त २०-२५ केस आहेत. माझी अशी इच्छा आहे की मी तुमच्या इतकी हुशार असते आणि कॉंग्रेस सोबत आले असते. खरच मी मूर्ख आहे. असा टोला कंगनाने उर्मिलाला लगावला होता.

उर्मिला मातोंडकर यांनीही कंगनाला उत्तर दिलं होतं. ‘वेळ आणि जागा तू सांग. माझ्या खरेदीच्या व्यवहाराची कागदपत्रे घेऊन तुला भेटायला येते. माझ्या व्यवहाराचा राजकारणाशी संबंध नाही हेही तुला दाखवेन,फक्त तिच्याकडे असणारी बॉलिवूड मधील ड्रग्ज घेणाऱ्याची लिस्ट जी कंगना एनसीबी देणार होती ती लिस्ट तिने घेऊन यावी तुमच्या उत्तराची मी वाट बगत आहे जय हिंद जय महाराष्ट्र.’ असं उर्मिला यांनी म्हटलं होतं.

या वादामध्ये आता काँग्रेसने ही उडी घेतलेली आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी कंगनाचं ट्वीट रीट्वीट करत ‘हा एक प्रकारचा कबुलीजबाब आहे आणि महाराष्ट्राच्या बदनामीच्या कटाचा सूत्रधार भाजप आहे हे यातून स्पष्ट झालंय,’ असं सांगत त्यांनी भाजपाला लक्ष केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!