Share

ग्रामपंचायत निवडणुकांची लढत आज होणार स्पष्ट

Published On: 

पुणे : राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 15 जानेवारीला सातारा जिल्ह्यातील तब्बल 900 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात आचारसंहिताही लागू झाली आहे. तर, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

कोरोनामुळे अनेक निवडणूक लांबणीवर पडल्या आहेत. यातील ग्रामपंचायती निवडणुकांचं मतदान येत्या १५ तारखेला पार पडणार आहे. दरम्यान, गावांमधील निवडणूक बिनविरोध व्हाव्यात यासाठी अनेक आमदारांनी पुढाकार घेतल्याचं दिसून आलं होतं. अनेकांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास लाखोंचा निधी देण्याचा शब्द दिला.

निवडणुकीच्या काळात भावकीतील तंटे, गावातील घटकांमध्ये वाद, ईर्ष्या, हे टाळून बंधुभाव व एकी कायम राहावी यासाठी या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला होता. दरम्यान, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून लढत कोणकोणत्या उमेदवारांमध्ये होणार हे चित्र आज स्पष्ट होईल. अनेक ग्रामपंचायत बिनविरोध कट गावातील लोकांनी या अभियानाला प्रतिसाद दिला. तर काही गावात चक्क सरपंचपदासाठी बोली देखील लावण्यात आली होती. प्रामुख्याने राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले, आमदार निलेश लंके, आमदार सुनील शेळके, आदी नेत्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!