🕒 1 min read
मुंबई : केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचं आंदोलन कडाक्याची थंडी आणि अवकाळी पावसातही सुरूच आहे. याच दरम्यान केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात आज पुन्हा एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. आंदोलनकर्ते शेतकरी आणि सरकार यांच्यातील ही सातवी बैठक आहे. त्यामुळे, आज तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दिल्ली बॉर्डरवर नव्या कृषी कायद्यांवरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, याच वेळी रिलायन्सच्या प्रोडक्ट्सचादेखील मोठ्या प्रमाणावर विरोध केला जात आहे. जिओच्या मोबाईल टॉवर्सना निशाणा बनवले जात आहे. आता यासंदर्भात रिलायन्सकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. कृषी कायद्यांच्या आडून अंबानी-अदानींसारख्या उद्योगपतींचा फायदा होणार असल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला होता. हे आरोप रिलायन्सने पत्रक जाहीर करून फेटाळले आहेत.
रिलायन्सच्या पत्रकानंतर भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. “रिलायन्सला टार्गेट करून विरोधक कृषी विधेयकांबाबत चुकीचं चित्र निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. शेतीविधेयकांच्या संदर्भात रिलायन्सच्या स्पष्टीकरणाने सरकारच्या बाजूने बळकटी मिळेल. शेतकऱ्याच्या मनात संभ्रम करायचा प्रयत्न केला जात आहे त्याला मूठमाती मिळेल. देशातल्या व राज्यातल्या शेतीसाठी आपण कटीबद्ध आहोत. हा विश्वास देशातील शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न रिलायन्सने केला आहे.” असं ते म्हणाले आहेत.
रिलायन्सद्वारे स्पष्टीकरण –
या तीनही कृषी कायद्यांसंदर्भात आपल्याला काहीही देणे-घेणे नाही आणि या कायद्यांचा कंपनीला काहीही फायदा नाही. तसेच, भविष्यातही कंपनीचा असा कुठलाही हेतू नाही. ते थेट शेतकऱ्यांकडून काहीही खरेदी करत नाहीत, असे रिलायन्सने म्हटले हे. तर, कंपनीने कधीही कॉर्पोरेट अथवा काँट्रॅक्ट पद्धतीने शेती केलेली नाही. तसेच भविष्यातही कंपनीची या व्यापारात उतरण्याची इच्छा नाही. कंपनीने पंजाब, हरियाणा अथवा भारतात कुठेही कॉर्पोरेट अथवा काँट्रॅक्ट फार्मिंगसाठी जमीण खरेदी केलेली नाही.
रिलायन्सने शेतकऱ्यांकडून खरेदीसंदर्भात कधीही कुठल्याही प्रकारचा दीर्घकालीन करार केला नाही. रिलायन्स आपल्या सप्लायरनासुद्धा एमएसपीवर खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या बाजूने आहे. कंपनी देशातील अन्नदात्यांचा सन्मान करते. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी योग्य तो मोबदला मिळायलाच हवा, या विचाराला कंपनीचा पूर्ण पाठिंबा आहे, असं निवेदनातून स्पष्ट करत रिलायन्सने सर्व आरोपांचे खंडन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची शक्यता; बाळासाहेब थोरात होणार पायउतार?
- भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या वापरावरून काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी नोंदविला आक्षेप
- ‘औरंगाबाद हे नाव दुर्दैवी; शिवभक्तांच्या अस्मितेचा विचार करुन सरकारने निर्णय घ्यावा’
- विलासकाका उंडाळकरांच्या अंत्यदर्शनासाठी रितेश देशमुख कराडमध्ये
- ग्रामपंचायत निवडणुकांची लढत आज होणार स्पष्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

