Share

‘मराठा समाजासाठी हा काळा दिवस, कोरोना असला तरी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही’

Published On: 

औरंगाबाद  : सकल मराठा समाज हा दिवस काळा दिवस म्हणून पाळणार आहे. मराठा आरक्षणाचा जो निर्णय झाला आहे. याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार आहे. आतापासूनच मराठा समाजाने रस्त्यावर उतरायला सुरुवात केली आहे. आता मराठा समाज शांत बसणार नाही. अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील यांनी मराठा आरक्षण रद्दच्या निर्णयावर बुधवारी (दि.५) दिली.

यावेळी बोलतांना ते म्हणाले, आम्ही संध्याकाळ पर्यंत पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक घेणार आहोत. आता जोपर्यंत मुख्यमंत्री स्वतः पुढे येऊन बोलत नाही. तोपर्यंत हा लढा सुरुच राहिल. कोरोना असला तरीही नियम पाळून विरोध करणारच. कारण निवडणूकांच्या वेळेस कोरोना येत नाही का? बीड, उस्मानाबाद, नांदेड याठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरलाय. लवकरच संपूर्ण राज्यात मराठा रस्त्यावर उतरेल. आता शांत बसून चालणार नाही.

मराठा क्रांती मोर्चाच्या मनोज गायके पाटील यांनी देखील यावर आपली प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या मानसिकतेचा आम्ही विरोध करत आहोत. आजपासून मराठा समाजाच्या एल्गारास आता आम्ही पुन्हा एकदा त्याच जोमाने सुरुवात करत आहोत. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आज रद्द करण्यात आला हे राज्य सरकारचे अपयश आहे. त्यांच्या राजकीय मानसिकतेचे अपयश आहे. आम्ही सर्वच राजकीय पक्षांचा तीव्र विरोध करत आहोत. सर्व राजकारणी एकत्र येऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपले मतभेद विसरू शकत नसतील तर मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.

मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण म्हणाले , मराठा समाजासाठी हा अत्यंत धक्कादायक निर्णय आहे. सरकारने याचा त्वरित अभ्यास करावा. केंद्र सरकारने देखील सकारात्मक विचार करून नाईन शेड्युल मध्ये हा निर्णय टाकण्याचा निर्णय घ्यावा. ते मराठा समाजासाठी अत्यंत दिलासादायक असेल.

शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी देखील मराठा आरक्षण रद्दच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया देतांना केंद्र सरकारवर याचे भांडे फोडले. ते म्हणाले, राज्य सरकारने प्रभावीपणे आपली बाजू मांडली आहे. तब्बल २८ राज्यात ५० टक्क्यांपुढे आरक्षण मिळालेले आहे. असे इतर राज्यात होऊ शकते तर महाराष्ट्रावरच हा अन्याय का? असा सवाल उपस्थित करत यावर जास्त भाष्य करणे त्यांनी टाळले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!