🕒 1 min read
विशाखापट्टणम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आंध्र प्रदेशात कोरोनाचा नव्या स्वरूपातील अत्यंत घातक विषाणू आढळला. एपी स्ट्रेन किंवा एन ४४० असे त्यास नाव देण्यात आले आहे. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीच्या संशोधकांनी तो शोधून काढला. भारतातील सध्याच्या विषाणूच्या तुलनेत हा विषाणू १५ पट जास्त धोकादायक आहे.
या विषाणूची बाधा झाल्यास रुग्ण ३-४ दिवसांत हायपोक्सिया किंवा डिस्पनियाचा शिकार होतो. या स्थितीमध्ये श्वास रुग्णाच्या फुप्फुसापर्यंत पोहोचणे बंद होते. योग्य वेळी उपचार व ऑक्सिजन मिळाला नाही तर रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. भारतात सध्या त्यामुळे जास्त रुग्णांचा मृत्यू होत आहे. सर्वात आधी त्याची ओळख आंध्र प्रदेशातील कुर्नुलमध्ये झाली. सामान्य लोकांमध्ये तो वेगाने पसरू लागला आहे.
चांगली इम्युनिटी असलेल्या लोकांनाही त्याची बाधा होत आहे. तरूण आणि लहान मुलांमध्ये तो वेगाने पसरू लागला आहे. म्हणूनच त्याची साखळी खंडित केली पाहिजे. अन्यथा कोरोनाची दुसरी लाट जास्त भयंकर ठरू शकते.
महत्वाच्या बातम्या
- आता फेसबुक, नेटफ्लिक्स, गुगलसारख्या कंपन्यांना डिजिटल कर भरावा लागणार
- ‘निलंग्यातील तहसीलदारांना निलंबित करा’, कोरोना मृत्यूवरून सर्वपक्षीय नेते आक्रमक
- महत्त्वाचा निर्णय! राज्य सरकारचे नवीन ‘पोषण कार्ड’, स्थलांतरित मातांसह अपत्यांना फायदा
- पालकांना दिलासा! शाळांनी फीमध्ये १५ टक्के कपात करावी, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
- लातूरमध्ये छुप्या मार्गाने देशी दारूची विक्री सुरूच


