Share

देशमुखांवर दाखल केलेला गुन्हा सरकार अस्थिर करण्यासाठीच; राज्य सरकारची उच्च न्यायालयात धाव

Published On: 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्रीपदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्या घरासह त्यांच्या १० मालमत्तांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले ४ मे रोजी परमबीर सिंह यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासोबतच, आपल्यावर झालेले आरोप हे खोटं असल्याचं सांगत महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठीचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आता सीबीआयनं अनिल देशमुखांविरोधात दाखल केलेला गुन्हा महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठीच असल्याचा आरोप राज्य सरकारने देखील केला असून सीबीआयच्या एफआयआरमधील दोन भाग वगळण्यासाठी राज्य सरकारने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच, सीबीआय हायकोर्टानं दिलेल्या निर्देशांच्या पलिकडे जाऊन तपास करू पाहतंय, असा ठपका देखील राज्य सरकारने ठेवला आहे.

राज्य सरकारचा काय आक्षेप ?

सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेणं आणि काही पोलीस अधिका-यांच्या बदल्यांबाबत सीबीआयच्या एफआयआरमध्ये असलेल्या उल्लेखावर राज्य सरकारने आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!