Share

…यामुळे सुजय विखे विजयी झाले : संग्राम जगताप

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजप आणि मित्रपक्षांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तर कॉंग्रेसचा राज्यासह देशात दारूण पराभव झाला आहे. नगरमध्येही भाजपच्या सुजय विखेंनी दणदणीत विजय मिळवला आहे.

सुजय विखे यांच्या विजयाबद्दल भाष्य करताना पराभूत उमेदवार संग्राम जगताप यांनी ‘सुजय विखेंचा विजय धनशक्तीमुळे झाला आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही योगदान विखे यांच्या विजयामध्ये आहे. धनशक्तीच्या जोरावर विखेंना एवढे मताधिक्य मिळाले असल्याच जगताप म्हणाले आहेत. पुढे बोलताना ‘उमेदवारी मिळाल्यानंतर अवघ्या २२ दिवसांत गावागावांत पोहोचलो. लोकांनी मोठ्या प्रमाणात माझ्यावर विश्वास दाखवला. दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले’ अशा शब्दात कार्यकर्त्यांचे ऋण व्यक्त केले आहे.

दरम्यान, संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी कालपासूनच सुरू केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!