Share

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची ‘ही’ नात ‘बंटी और बबली २’चित्रपटात झळकणार..!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड चित्रपटापैकी ‘बंटी और बबली’ हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. आता जवळपास १६ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या चित्रपटाच्या माध्यमातून एक खास नवोदित कलाकार झळकणार असून कोण आहे ‘ती’ याकडे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे.

अभिनेत्री राणी मुखर्जी, सैफ अली खान यांचा ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि राणी जवळपास १२ वर्षानंतर एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होते. ‘बंटी और बबली २’मध्ये सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी व नवोदित अभिनेत्री शर्वरी वाघ यांच्या मुख्य भूमिका आहेत. विशेष म्हणजे शर्वरी वाघचं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याशी खास नाते आहे.शर्वरी ही मनोहर जोशी यांची नात असून शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांची मुलगी आहे. शर्वरीचे वडील शैलेश वाघ प्रसिद्ध उद्योगपती आहेत.

अलिकडेच शर्वरी वाघने अमेझॉन प्राइमवरील ‘द फॉरगॉटन आर्मी’ या वेब सीरिजच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. पदार्पणातच शर्वरीच्या अभिनयाची आणि सौंदर्याची चर्चा झाली. कबीर सिंग दिग्दर्शित ‘द फॉरगॉटन आर्मी’ या वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शर्वरीने ‘प्यार का पंचनामा २’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘सोनू के टिटू की स्विटी’ या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. तसेच तिने बऱ्याच नाटकांमध्ये काम केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!