🕒 1 min read
मुंबई : काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील सुरज जाधव या तरुण शेतकऱ्याने विजेचे कनेक्शन कापल्याने फेसबुक लाईव्ह करत विषप्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान, या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच हे सरकार कोडगं असून बिल्डरांसाठी आणि बेवड्यांसाठी धोरण ठरवतं, असेही फडणवीस म्हणाले आहेत.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,‘हा प्रश्न आम्ही विधानसभेत मांडला असून सरकारने शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापावी, अशी मागणी केली. हे सरकार कोडगं असून बिल्डरांसाठी आणि बेवड्यांसाठी धोरण तयार करत’, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘राज्याचे उपमुख्यमंत्री वीज कनेक्शन मे पर्यंत कापणार नाही, असे म्हणाले होते. परंतु, उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला ऊर्जा मंत्र्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी वीज बील थकवलं तरी डीपी काढून नेण्यात येत आहेत. तसेच रब्बीचा हंगाम खराब झाला आता खरिपाचा हंगाम खराब होणार अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे’, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- “नवाब मलिक समोर येतील तेव्हा…”, न्यायालयाच्या सुनावणीनंतर मलिक कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया
- गौतम गंभीरने अश्विनची तुलना केली ‘या’ महान भारतीय दिग्गजाशी, म्हणाला…
- शेतकऱ्याने स्वतः घरीच बनविले जैविक कीटकनाशक; आर्थिक खर्चापासून केली सुटका!
- कुलदीपच्या कारकिर्दीतील अंधार संपेना; अक्षरच्या पुरागमनाने कसोटी संघातून हकालपट्टी
- राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात BAMU मध्ये निषेधाचा ठराव मंजूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
