🕒 1 min read
मुंबई:- कृषी कायद्यांवरून सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनांमुळे देश ढवळून निघाला आहे आणि देशाचं राजकारणही तापलं आहे. तीन कृषी कायद्यांबाबब सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये विज्ञान भवनात शुक्रवारी झालेली १२ व्या फेरीतील चर्चाही निष्फळ ठरली. यावेळी पुढील चर्चेची तारीखही ठरली नाही. तर आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कडाडून विरोध केला आहे. कृषी कायद्यात तरतूद असलेल्या करार शेती पद्धतीला शरद पवारांसह त्यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी जोरदार विरोध केला आहे. पण याबाबत पवारांची दुटप्पी भूमिका समोर आली आहे.
बारामती येथे रोहित पवार आयोजित कृषिक या कृषी नाविन्यपूर्ण प्रदर्शनात रोहित पवार प्रमुख असलेल्या बारामती एग्रोने चक्क आपले प्रमुख ‘राजकीय’ विरोध करत असलेल्या करार शेतीचे भरमसाट फायदे सांगितले आहेत. आणि विशेष म्हणजे हे फायदे सांगणारे फ्लेक्स देखील मोठ्या थाटात लावले आहेत.
दरम्यान, एका बाजूला कृषी कायद्यातील करार शेतीला विरोध करायचा आणि दुसरीकडे आपल्या कंपनीची करार शेती कशी फायद्याची आणि योग्य आहे हे दाखवून द्यायचं हा पवारांचा दुटप्पीपणा नाही का ? असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे.
दरम्यान, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी रोहित पवार यांना याच मुद्द्यावरुन धारेवर धरलं आहे. त्यांनी बारामती ऍग्रोच्या करार शेतीचे फोटो ट्विट केले आहेत आणि रोहित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. शेतकरी कायद्यांना विरोध करणाऱ्या राजकारणी मंडळींच्या कॉन्ट्रॅक फार्मिंग कंपन्यांचे बॅनर पाहून आनंद झाला. हा दुटप्पीपणा किळसवाणा आहे, असं भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
शेतकरी कायद्यांना विरोध करणाऱ्या राजकारणी मंडळींच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या कंपन्यांचे बॅनर पाहून आनंद झाला. हा दुटप्पीपणा किळसवाणा आहे @RRPSpeaks pic.twitter.com/pNtVX3Vmkt
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 24, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘…तर भारतीय संघाकडे शार्दुलकर आहे’ ; सचिनशी तुलना करत ठाकूरला दिलं नवं टोपणनाव’
- …तर तो भारताचा एक प्रकारे अपमानच होईल : केविन पीटरसन
- वरुण धवन आणि नताशा दलाल अडकले लग्नबंधनात
- ‘ममता बॅनर्जी यांचा ‘वीक पॉइंट’ बंगाल भाजपने ओळखला आहे; ममताजींनी चिडायला नव्हतं पाहिजे’
- ‘त्याच वेगवान गोलंदाजांना सतत खेळवणे ही…’ चॅपेल गुरुजींनी टोचले कांगारूंचे कान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
