नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड दिल्यानंतर टीम इंडिया इंग्लडविरुद्ध भिडण्यासाठी सज्ज आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात येणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही सामन्यांचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे.
दरम्यान, भारताविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात जॉनी बेअरस्टोला वगळण्याचा निर्णयावर टीका होत आहे. त्यात माजी कर्णधार केविन पीटरसन याने म्हटले की, जर इंग्लंडची निवड समिती भारताविरोधात आपला सर्वोत्तम संघ उतरवणार नसेल तर तो भारताचा एक प्रकारे अपमानच होईल.’ बेअरस्टोसोबतच अष्टपैलू सॅम कुर्रन, गोलंदाज मार्क वुड यांनादेखील संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. ईसीबीने खेळाडूंच्या व्यवस्थापन नीतीअंतर्गत बेअरस्टोला पहिल्या दोन कसोटींमध्ये विश्रांती दिली आहे.
पीटरसनने सांगितले की, भारताविरोधात पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया विरोधातील विजयासारखेच आहे. निवडकर्त्यांना स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांना खेळवण्याचा आग्रह केला आहे.पीटरसनने ट्विट केले की, ‘ इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारतविरोधात खेळण्यासाठी सर्वोत्तम संघ निवडला नाही. हा एक वादाचा मुद्दा आहे. भारतामध्ये विजय मिळवणे हे ऑस्ट्रेलियात विजय मिळवण्यासारखेच आहे. हा इंग्लिश चाहते आणि भारताचादेखील अपमान आहे. ब्रॉड व अँडरसन यांना खेळवायला हवे.’
महत्वाच्या बातम्या
- पवारांचा दुटप्पीपणा, एकीकडे कृषी कायद्यांना विरोध तर दुसरीकडे गात आहेत करार शेतीचे गोडवे
- राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंचा विसर ? भाजप नेते म्हणतात, शिवसेनेला जागा दाखवली !
- शिवसेना आमदाराच्या गोलंदाजीवर उर्मिला मातोंडकरांची फटकेबाजी
- ‘पुरंदरचं प्रस्तावित विमानतळ बारामतीला हलवण्याचा पवारांचा डाव’ ; शिवसेना नेत्याचा आरोप
- ‘ममता बॅनर्जी यांचा ‘वीक पॉइंट’ बंगाल भाजपने ओळखला आहे; ममताजींनी चिडायला नव्हतं पाहिजे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
