🕒 1 min read
मुंबई: मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आता यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाना साधला आहे.
मराठीत पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना २ अतिरिक्त वेतनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.असा निर्णय पूर्वीही घेण्यात आला होता मात्र २०१५ पासून त्याची अंमलबजावणी अनाकलनीय कारणामुळे बंद होती. आता कदाचित येणाऱ्या निवडणुकांमुळे हा निर्णय घेण्यात आला असावा. असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.
मराठीत पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या मुम्बई महापालिका कर्मचाऱ्यांना २ अतिरिक्त वेतनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
असा निर्णय पूर्वीही घेण्यात आला होता मात्र २०१५ पासून त्याची अंमलबजावणी अनाकलनीय कारणामुळे बंद होती. आता कदाचित येणाऱ्या निवडणुकांमुळे हा निर्णय घेण्यात आला असावा. pic.twitter.com/3Zhh3LFte0— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 19, 2021
दरम्यान महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा १०० टक्के वापर व्हावा, त्याचप्रमाणे महापालिकेचे सर्व व्यवहार जास्तीत जास्त सोप्या, सुटसुटीत आणि अर्थपूर्ण भाषेत व्हावे आणि मराठी भाषेचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी मराठी भाषा विषयामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याबाबत मुंबई महापालिकेने ठराव मंजूर केला होता. त्यामुळे माय मराठीसाठी महापालिकेचा ठराव क्रमांक ११६५ ची अंमलबजावणी करण्यात यायलाच हवी, अशी भूमिका नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आता घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी’
- त्यांची जीभ घसरली होती आता पाय घसरला जाऊ नये; नवाब मलिकांचे चंद्रकांत पाटलांना खडेबोल
- सर्वात आधी महाविकास आघाडी स्थापन करणाऱ्या हिंगोलीतच ‘आघाडीत बिघाडी’?
- कश्मिरा शाह, सुनिता आहुजा यांच्यात पुन्हा वाद..?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
