पुणे : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाचा २-१ अशा फरकाने पराभव करत कसोटी, टी-२० पाठोपाठ एकदिवसीय मालिका खिशात घातली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने जरी विजय संपादन केला असेल मात्र या सामन्यात इंग्लंडकडून एकाकी झुंज देणारा सॅम करनचे सगळीकडे कौतुक होत आहे.
सॅम करनने दिलेल्या एकाकी झुंजीमुळे सामना आखेरच्या षटकांपर्यंत गेला. सॅमने आखेरच्या षटकापर्यंत इंग्लंडच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. या सामन्यात सॅम करनने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद ९५ धावांची खेळी साकारली. सामना संपल्यानंतर सगळीकडे सॅमचे कौतुक सुरु असताना मात्र सॅमने एका भारतीय गोलंदाजाचे कौतुक करताना म्हणाला की, या गोलंदाजाला खेळताना सर्वाधिक त्रास झाला.
भारताकडून टी नटराजनने शेवटच्या षटकांत उत्कृष्ट गोलंदाजी केली. या मैदानावर धावा वाचवणे कठीण होते मात्र टी नटराजनने सिद्ध करुन दाखवले की तो किती श्रेष्ठ आहे. भुवनेश्वरही चांगला गोलंदाज आहे मात्र मी त्याला खेळून काढले. नवीन शिकण्याच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा दौरा होता. आता माझे लक्ष्य आगामी आयपीएल स्पर्धेवर आहे.
महत्वाच्या बातम्या
- पोटात दुखू लागल्याने खा.शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- होली है…! निक सोबत प्रियंकाने अशी साजरी केली होळी, पाहा फोटो
- पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई; वेशांतर करून पकडले ११ जुगरूंना
- पवार आणि शहा यांची भेट झाली ही केवळ अफवा आहे; राष्ट्रवादीची सारवासारव सुरूच
- वजन कमी करण्यासाठी रोजच्या आहारात ‘या’ हेल्दी फूडचा करा समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

