Share

पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई; वेशांतर करून पकडले ११ जुगरूंना

Published On: 

जालना: शहराच्या बायपास मार्गावर जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी वेशांतर करून घटनास्थळी जाऊन तेथील जुगरूंना फिल्मी स्टाईलमध्ये अटक केली. ही घटना जालना शहराच्या बायपास मार्गावरील प्रकाश ट्रान्सपोर्टच्या मागच्या बाजूला घडली.

शहराच्या बायपास मार्गावरील प्रकाश ट्रान्सपोर्टच्या पाठीमागे काही दिवसांपासून जुगार सुरू असल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास ज्वारीच्या शेतातून चंदनझिरा ठाण्याचे तीन कर्मचारी वेशांतर करून पत्ते खेळायचे म्हणून पत्र्याच्या त्या शेडमध्ये सुरू असलेल्या क्लबमध्ये घुसले. त्यातील एक पोलीस कर्मचारी आत थांबला तर बाकी दोन जणांनी दरवाजात थांबून एकालाही बाहेर न पडू देता ११ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.

जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी जुगरांचे अड्डे सुरु आहेत ते लवकरात लवकर कारवाई करून बंद करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी जालना जिल्ह्यातील संपूर्ण ठाण्यांना दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रकाश ट्रान्सपोर्टच्या पाठीमागे काही दिवसांपासून मोठा पत्त्याचा क्लब सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. एका शेतात पत्र्याच्या शेडमध्ये हा क्लब सुरू असतो, अशी माहिती चंदनझिरा पोलीस ठाण्याला मिळाली होती. या माहितीच्या आधारे चंदनझिरा पोलिसांनी शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास धाड टाकण्याचा सापळा रचला.

चंदनझिरा पोलीस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचारी पत्ते खेळायचे म्हणून साध्या वेषात ज्वारीच्या शेतातून पत्त्याच्या क्लबवर गेले. त्या क्लब मध्ये पोलीस गेले तेव्हा तिथे ११ जण पत्ते खेळत होते. आम्हाला सुद्धा पत्ते खेळायचे म्हणून हे तिघेजण पत्र्याच्या शेडमध्ये घुसले. यानंतर, आत घुसल्यानंतर पोलिस कर्मचारी अनिल काळे यांनी आतून कडी लावून घेत पोलिस असल्याचा जुगाऱ्यांना परिचय दिला. यामुळे काही जण पळून जाण्याच्या प्रयत्न करीत होते. परंतु, चंद्रकांत माळी, साई पवार हे दरवाजाजवळच उभे होते. यानंतर पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सावळे, नंदलाल ठाकूर हेही या ठिकाणी पोहोचले आणि  ११ जणांना ताब्यात घेण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!