Share

सामनावीर एबी डिव्हिलीयर्सची आणखी एका विक्रमाला गवसणी; ‘हा’ विक्रम करणारा केवळ दुसराच खेळाडू

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्स संघाने दिल्ली कॅपीटल्स संघाचा अवघ्या एका धावेने पराभव केला. आरसीबीने दिलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजानी १७० धावांपर्यंत मजल मारली. आखेरच्या चेंडुवर षटकाराची गरज असताना रिषभ पंतने चौकार मारल्याने एका धावेने आरसीबीचा विजय झाला. या विजयानंतर आरसीबी संघ हा पुन्ह गुणतालीकेत पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. धडाकेबाज खेळीसाठी आरसीबीचा फलंदाज एबी डिव्हीलियर्सला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यात आरसीबी संघाने पहिल्या डावात १७१ धावांचा डोंगर उभा केला. यात आरसीबीचा धडाकेबाज खेळाडू एबी डिव्हीलीयर्सने धडाकेबाज अर्धशतक झळकावले. या खेळीदरम्यान एबीने आयपीएलमध्ये पाच हजार धावा पुर्ण केले. आयपीएलमध्ये पाच हजार धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत एबी केवळ दुसराच विदेशी खेळाडू ठरला आहे. या यादीत सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर हा पहिला खेळाडू आहे, ज्याच्या आयपीएलमध्ये पाच हजार धावा पुर्ण झाल्या आहे.

एबीने ५ हजार धावा या १६१ डावात पुर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वात वेगाने ५ हजार धावा करण्याचा विक्रम हा डेव्हिड वॉर्नरच्या नावे आहे. वॉर्नरने अवघ्या १३५ डावात ही कामगीरी केली होती. तर ५ हजार धावा करणाऱ्या फंलदाजाच्या यादीत एबी सहावा फलंदाज ठरला आहे. या यादीत विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन हे आहेत. आता या यादीत एबीचा समावेश झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!