Share

अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरा समन्स ; सोमवारी हजर राहण्याचे दिले आदेश

Published On: 

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा धक्कादायक आरोप लावला होता. परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती. दरम्यान अनिल देशमुख यांच्या दोन्ही खासगी सचिवांना अटक झाल्यानंतर ईडीने आपला मोर्चा अनिल देशमुख यांच्याकडे वळवला. अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांनी कोरोनाचा काळ आणि वय वाढल्यामुळे चौकशीला हजर राहण्यापासून मुदत मागितली होती.

अनिल देशमुख यांना आज ईडीने तिसरे समन्स बजावलं आहे. देशमुख यांना येत्या 5 जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, चौकशीच्या ससेमिऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी देशमुख दिल्लीला रवाना झाले असून सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे.

याअगोदर ईडीने दोनदा समन्स बजावले होते. यादरम्यान त्यांनी प्रकृती ठिक नसल्याचे कारण देऊन ईडीच्या चौकशीला हजार राहिले नव्हते . त्यानंतर त्यांनी सात दिवसाची मुदत मागवून घेतली होती. येत्या सोमवारी 5 जुलै रोजी त्यांची ही मुदत संपत आहे. त्यामुळे ईडीने आज त्यांना समन्स बजावले असून सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे देशमुख सोमवारी ईडीच्या चौकशीला सामोरे जातात का? हे पाहावे लागेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!